1 मे-महाराष्ट्र दिन | Maharashtra din in marathi
![]() |
'Maharashtra din in marathi' |
महाराष्ट्र दिवस म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र दिन हा 1 मे रोजी साजरा केला जातो. द्विभाषिक मुंबई राज्याची फाळणी होऊन 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली; म्हणून हा दिवस महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1 मे हा मुंबई सुट्टीचा दिवस म्हणून देखील ओळखला जातो. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. मंगल आणि पवित्र असणारी ही महाराष्ट्राची माती येथील भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्रात जन्मलेला प्रत्येक जण महाराष्ट्राच्या भूमीवर जीवापाड प्रेम करतो. म्हणूनच आपल्या मातीतील राज्य निर्मितीचा जल्लोष येथील भूमिपुत्र 1 मे रोजी साजरा करत असतात. शिवराय, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी समृद्ध झालेला महाराष्ट्र हा भारताच्या भाळावर कोहिनूर हिऱ्यासारखा चमकत असतो. 'Maharashtra din in marathi'
या मराठी मातीचे गुणगान अनेक प्रतिभावात व्यक्तींनी करून ठेवले आहे. विविधतेने नटलेली ही महाराष्ट्राची माती पवित्र आहे, मंगल आहे, राकट, कनखर असून ती नाजूक, कोमल फुलांसारखी सुगंध दरवळणारी आहे. हिमालयाला लाजवणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत स्वर्गाला आपल्या दारी उतरवणाऱ्या श्रीमान रायगडाणे महाराष्ट्राला शौर्याची उंची दिली. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मराठी मुलखाचा आनंदोत्सव म्हणजे 1 मे हा दिवस आहे; असं म्हणायला काहीच हरकत नाही.
• राज्य - महाराष्ट्र
• राजधानी - मुंबई
• उपराजधानी - नागपूर
• निर्मिती - 1 मे 1960
• भाषा - मराठी
• जिल्हे - 36
महाराष्ट्र दिन कसा साजरा केला जातो
'Maharashtra din in marathi' 1 मे रोजी आनंदी मनाने, उत्साहाने सर्वजण एकत्र येऊन शासकीय ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महाराष्ट्र दिनाचा इतिहास उलगडला जातो. लेझीम, ढोल, ताशा, पताका आणि महाराष्ट्र गौरवाच्या घोषणा देत मिरवणुका देखील काढल्या जातात. 1 मे रोजी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर परेड घेतल्या जाऊन महाराष्ट्राचे राज्यपाल आपल्या मनोगतातून जनतेला संबोधित करतात; आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतात. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे हुतात्मा चौकात जाऊन महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यास अभिवादन करून त्यांचे स्मरण करतात.
महाराष्ट्राची निर्मिती
पूर्वी भारत देश हा इंग्रजांच्या ताब्यात होता. भारतात उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमुळे इंग्रजांच्या ताब्यातून भारत मुक्त झाला. तेव्हा देशातील राज्य हे विखुरलेले होते. द्विभाषिक मुंबई हे एक त्यातीलच. दरम्यान मुंबईत भाषावार राज्य निर्मिती च्या चळवळी जोर धरू लागल्या. यात गुजराती आणि मराठी भाषिक लोकं स्वतंत्र प्रांतासाठी मोठमोठे आंदोलने करू लागली. गुजराती भाषिकांकडून गुजरात आणि मराठी भाषिकांकडून स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती ही प्रमुख मागणी होती.
21 नोव्हेंबर 1956 ला चिडलेल्या मराठी आंदोलकांनी राज्य पुनर्रचना आयोगला मुंबईमध्ये येण्यास नकार दिला; आणि मोर्चाला सुरुवात केली. चर्चगेट, बोरीबंदर या रस्त्यांनी जनसमुदाय घोषणा देत एकत्र जमला होता. आंदोलकांना हटवण्यात पोलिसांना अपयश आल्यानंतर मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशाने पोलिसांनी आंदोलक जमावावर लाठीचार्ज, गोळीबार केला आणि आंदोलनातील 106 आंदोलक हे हुतात्मा झाले. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 जण आपल्या प्राणाला मुकले होते. 'Maharashtra din in marathi'
1956 साली महाराष्ट्राच्या निर्मिती साठी स्थापन केलेल्या समितीचे अहवाल आणि 106 जणांचे बलिदानामुळे 25 एप्रिल 1960 रोजी बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 मंजूर होऊन, 1 मे 1960 रोजी अमलात आला. तेव्हा मुंबई सह स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. 1 मे 1960 रोजी पंडित नेहरूंनी महाराष्ट्राची निर्मिती करून राज्याचे सूत्र यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सोपवले; आणि यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.
हे देखील वाचा - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
महाराष्ट्र गीत
जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्य गीत आहे. 1960 म्हणजे महाराष्ट्राच्या अगदी स्थापनेपासून महाराष्ट्राला अधिकृतपणे कोणतेही राज्यगीत नव्हते. मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेऊन भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्राच्या अधिकृत राज्य गीताची घोषणा केली. जय जय महाराष्ट्र माझा | गर्जा महाराष्ट्र माझा हे दोन चरणांचे गीत 1.41 मिनिटे कालावधीचे आहे. कविवर्य राजा बढे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीताला संगीतकार श्रीनिवास खळे यांचे संगीत लाभले आहे.
जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून लागू होईल अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. हे राज्यगीत शाळांमध्ये राष्ट्रगीत आणि प्राथने सोबत गायले जाईल असे त्यांनी सांगितले. 'Maharashtra din in marathi'
![]() |
महाराष्ट्र गीत 'Maharashtra din in marathi' |
1 मे-कामगार दिन
एक मे 1960 ला मुंबईचे विभाजन होऊन स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली; म्हणून 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो. तसेच 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून देखील जगभर साजरा केला जातो.
जगभर झालेल्या कामगार चळवळींचा गौरव करण्यासाठी 1 मे 1890 पासून 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. 'Maharashtra din in marathi'
FAQ
महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो?
- 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.
मुंबई प्रांताच्या विभाजनातून कोणत्या दोन राज्यांची निर्मिती झाली?
- मुंबई प्रांताच्या विभाजनातून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली.
महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
- मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
0 Comments